भारत जीवन विमा निगम (LIC) ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणखी एक नवी योजना आणली आहे. कंपनीने काही दिवसांआधीच ग्राहकांसाठी एक खास योजना तयार केली आहे. ज्या लोकांना वृद्धापकाळात पेंशनची चिंता असते त्यांच्यासाठी हा खास प्लान आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊयात या योजनेबद्दल….
काय आहे LIC ची ही योजना? - एलआयसीच्या या योजनेचं नाव जीवन अक्षय-7 (प्लान नंबर 857) आहे. ही एक सिंगल प्रीमियमवाली नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल एन्युटी योजना आहे. 25 ऑगस्ट 2020 ला ही पॉलिसी सुरू झाली आहे.
हा प्लॅन 30 वर्ष ते 85 वयोगटातील नागरिकांसाठी आहे. दिव्यांगजन किंवा विकलांगांसाठीदेखील ही योजना गुंतवणूक केली जाऊ शकते.
पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर कर्जाची सुविधादेखील उपलब्ध आहे. म्हणजेच पॉलिसीधारक देखील कर्ज घेण्यासाठी सक्षम असतील.
महिन्याला मिळतील 19 हजार - या पॉलिसीत तुम्ही कमीत कमी 1 लाखाची गुंतवणूक किंवा त्यापेक्षा अधिक कितीही गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या पॉलिसीत एकरकमी 40 लाख 72 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 19 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.
यामध्ये एकाच कुटुंबातील दोघेजण म्हणजेच आजी-आजोबा, आई-वडील, मुले, (नातवंडं), जोडीदार किंवा भावंड यांच्यात जॉइंट लाइफ एन्युटी घेऊ शकतात. पॉलिसी सुरू झाल्याच्या 3 महिन्यानंतर कर्जाची सुविधा फ्री-लुक कालावधी संपल्यानंतर केव्हाही उपलब्ध असेल.
दररोज एवढी करा बचत आणि सेवानिवृत्तीनंतर मिळवा 1 कोटी रुपये, जाणून घ्या याबाबत अधिक माहिती