वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
वेलचीमुळे आपल्या फुफ्फुसात जलद रक्त संचार होतो. यामुळे दमा, तीव्र सर्दी आणि खोकला यासारख्या श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
जर तुम्हाला सतत अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर वेलची उपायकारक आहे. वेलचीमुळे शरीरात उर्जा प्राप्त होते. त्यामुळेच वेलची सेवन करणं चांगलं मानलं जातं.
वेलचीचे सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरीरातील बहुतेक रोग उच्च रक्तदाबमुळे उद्भवतात. जर आपण दररोज कमीतकमी 3 वेलची खाल्ली, तर आपला रक्तदाब नियंत्रणात राहील.
वेलची खाल्ल्याने तुमच्या तोंडाचा दुर्गंध देखील दूर होतो. वेलची एक प्रकारे माऊथ फ्रेशनर प्रमाणे कार्य करते. जर आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर आपण नेहमीच तोंडात एखादी वेलची ठेवू शकता. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)