Mango | उगाच आंब्याला फळांचा राजा म्हटले जात नाही, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे…
उन्हाळ्यात आंबा खाल्ला जातो. हे एक अतिशय चवदार फळ आहे. आंब्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते, चविष्ट असण्यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. या फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे, त्यात फोलेट, बीटा कॅरोटीन, लोह, जीवनसत्त्वे ए आणि सी तसेच कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात. आंब्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ते पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.