Skin Care | पिग्मेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा!
दही आणि लिंबाचा फेसपॅक त्वचेच्या अनेक समस्या दूर करतो. दही आणि लिंबू मिक्स करून चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ मसाज करा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. टोमॅटो किसून घ्या आणि ते गाळून रस काढा. आता या रसात एक चमचा मध घाला. ते चांगले मिसळा. याने मानेला आणि चेहऱ्याला मसाज करा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.
Most Read Stories