Glowing Skin Tips : ‘व्हिटॅमिन सी’युक्त हे खास पेय प्या आणि ग्लोइंग त्वचा मिळवा!
व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर असते. तसेच व्हिटॅमिन सी तुमची त्वचा सुधारण्यास देखील मदत करते. दररोजच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ घेतले तर आपल्या त्वचेचा टोन सुघारण्यास मदत होते.
दररोज सकाळी प्या हे ड्रिंक्स आणि शरीर ठेवा निरोगी
Follow us
दररोज सकाळी प्या हे ड्रिंक्स आणि शरीर ठेवा निरोगी
शरीरात व्हिटॅमिन सी वाढवण्यासाठी आपण काही खास पेय आहारात घेऊ शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल.
किवीचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतो. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते.
स्ट्रॉबेरीला बर्याच लोकांनी सुपरफ्रूट देखील म्हटले आहे. 1 कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. स्ट्रॉबेरीचा रस पिल्यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते.
कलिंगडचा रस पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे कलिंगडमुळे त्वचा सुधारण्यास मदत होते.