
वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवसातून चार ते पाच ग्लास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो असे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हाही जिऱ्याचे पाणी प्याल. तेव्हा त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या.

तज्ज्ञांच्या मते जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने यकृताच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्तनपान करताना जिऱ्याचे सेवन करणे उत्तम मानले जात असले तरी वजन कमी करण्यासाठी या काळात जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात घेतले तर नवजात मातांनाही स्तनपान करताना समस्या येऊ शकतात.

मधुमेहाच्या रुग्णांनी जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिऱ्याचे सेवन केले जात असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्याने नुकसान होऊ शकते. जिऱ्याचे पाणी जास्त प्यायल्यानेही उलट्या होऊ शकतात. असे म्हटले जाते की जिऱ्याच्या पाणीमुळे उलट्या होऊ शकतात.