संपूर्ण देशात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत सतर्क होण्याची गरज आहे. विशेषतः प्रत्येकाला आपली प्रतिकारशक्ती बळकट करण्याची गरज आहे.
मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे.
तुळस, सुंठ, दालचिनी, लवंग आणि मिरची हे बारीक करून त्याची पावडर तयार करा. एक चमचा मधामध्ये ही पावडर मिक्स करून घ्या.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण घ्यावे. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. तसेच तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल.
मध आणि मसाल्यांची पावडर घेताना हे नेहमी लक्षात ठेवा की, मसाला पावडरचे प्रमाण एक चमचापेक्षा अधिक नको.