Skin care : शरीरावरील पिंपल्सना हलक्यात घेऊ नका, ‘या’ टिप्स ठरू शकतात फायदेशीर
चेहऱ्यावरील पिंप्लसना घालवण्यासाठी वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. मात्र संपूर्ण शरीरावर मुरूम असेल तर त्याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. खालील टीप्स शरीरावरील पिंपल्सना हटवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
1 / 5
मुंबई : चेहऱ्यावरील पिंप्लसना घालवण्यासाठी वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. मात्र संपूर्ण शरीरावर मुरूम असेल तर त्याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. खालील टीप्स शरीरावरील पिंपल्सना हटवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. बॉडीवर पिंप्लस येत असतील तर शक्यतो थंड पाण्यानेच अंघोळ करावी. थंड पाण्यात काही प्रमाणात गरम पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.
2 / 5
शरीरावरील पिंपल्स हटवण्यासाठी स्क्रबिंगचा उपयोग करता येतो. आठवड्यातून एक वेळा बॉडी स्रबिंग नक्की करावं.
3 / 5
शरीरावर पिंपल्स येत असतील तर रात्री झोपताना कॉटनचे कपडे परिधान करावेत. तसेच थोडे सैल कपडे परिधान करणे कधीही चांगलंच.
4 / 5
शरीरावरील मुरूम हटवण्यासाठी कडुलिंबाची पेस्ट प्रभावी आहे. कडुलिंबाची पाने बारीक करून त्याची पेस्ट शरीरावरील पुरळांवर लावा. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.
5 / 5
मध शरीराला कोरडे पडू देत नाही. तसेच दालचिनी मुरुम दूर करण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे या दोन्हींची पेस्ट बनवा. तसेच शरीरावर लावून सुमारे एक तास राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका.