अनेकदा केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केल्यामुळे आपल्या त्वचेवर गंभीर परिणाम होतो. अश्यात निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी तुम्ही काही घरगुती आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकता. तुमच्या चेहऱ्याला चमकदार बनवू शकता.
चंदन पावडर - अर्धा चमचा चंदन पावडर पाण्यात मिसळा. त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. 10 मिनिटं तसंच राहू द्या. यामुळे मुरुम, सुरकुत्या आणि चेहऱ्यावरच्या रेषा कमी होण्यास मदत होते.
लिंबाचा रस, गव्हाचं पीठ, हळद - लिंबाचा रस, गव्हाचं पीठ आणि हळद एकत्र करून पेस्ट बनवा. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दहीदेखील वापरू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहरा व्यवस्थित सुकू द्या. लिंबाच्या रसामध्ये असलेले अॅसिड त्वचा स्वच्छ करण्याचं काम करते. चेहऱ्यावरचे गडद डागही यामुळे जातात. हळदीमुळे त्वचेवर चमक येते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा सुधारण्यास मदत करते.
मध - केवळ कोरडी त्वचाच नाही तर तेलकट त्वचेलाही मॉइश्चरायझिंगची गरज असते. यासाठी तुम्ही मधाचा वापरू शकता. मध हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. चेहऱ्यावर मध लावा. 15 मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.
मुलतानी माती - एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यात तीन चमचे गुलाबपाणी टाका. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. पॅक पूर्णपणे कोरडे होईपर्यंत तसाच राहू द्या. थोड्या वेळाने चेहरा धुवा. तेलकट त्वचेसाठी हा पॅक खूप फायदेशीर आहे.