Honeymoon Destinations | हनिमूनच्या निमित्ताने परदेशवारीची योजना आखताय? मग, ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या!
Honeymoon Destinations : हनिमून साजरा करण्यासाठी जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जोडपे त्यांच्या खाजगी क्षणांचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. जाणून घेऊया अशा ठिकाणांबद्दल...
1 / 7
जोडप्यांना त्यांच्या लग्नाची जितकी स्वप्ने असतात तितकीच त्यांची हनिमूनची स्वप्ने देखील असतात. प्रत्येकाला लग्नानंतर काही खास ठिकाणी वैयक्तिक वेळ घालवायचा असतो. हनिमून दाम्पत्याच्या आयुष्यात एक वेगळीच अनुभूती देतो आणि नवीन नात्याची सुरुवात करण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला विदेशातील काही खास हनिमून ठिकाणांबद्दल सांगणार आहोत...
2 / 7
पॅरिस शहर अर्थात सिटी ऑफ लाईट्स हे सर्वात रोमँटिक शहर आहे. असे म्हणतात की, येथे रात्र कधीच नसते. पॅरिस आपल्या अनोख्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही आयफेल टॉवर, द आर्क डी ट्रायम्फे, रिव्हर क्रूझ, द पाल्स ऑफ व्हर्सायचा आनंद घेऊ शकता.
3 / 7
हल्ली मालदीव हनिमूनसाठी प्रसिद्ध ठिकाण बनले आहे. येथील निळे पाणी तुमचा रोमान्स आणखी वाढवेल. मालदीवमध्ये तुम्ही बनाना रीफ, मालदीव व्हिक्ट्री, एचपी रीफमध्ये फिरू शकता.
4 / 7
हनिमूनसाठी फिलीपिन्सला सर्वोत्तम पर्यायही म्हटले जाते. एल निडो हे फिलीपिन्समधलं एक अतिशय सुंदर आणि भव्य ठिकाण आहे, जिथे प्रत्येकाला भेट द्यायला आवडते. स्मॉल लॅगून, कॅथेड्रल बीच, स्नेक आयलंड ही इथे भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत.
5 / 7
बेलीझ हे जगातील सर्वात आकर्षक हनिमून ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्र परिसर तुमचे मन मोहून टाकणारा आहे. इथलं वातावरण सगळ्यांना वेड लावते.
6 / 7
स्वित्झर्लंड हे पहिल्यापासून येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. हे ठिकाण आपल्या आकर्षक सौंदर्यामुळे जगभरातील जोडप्यांना आकर्षित करते. येथे भेट देण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. येथे तुम्ही स्विस नॅशनल पार्क, द मॅटरहॉर्न, फास्नाच स्प्रिंग कार्निवलचा आनंद घेऊ शकता.
7 / 7
बोरा बोरा बेट हे सर्वात रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. हनिमून साजरा करण्यासाठी जोडप्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथील सुंदर आणि मनमोहक दृश्ये नवविवाहित जोडप्यांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण करतात. येथे तुम्ही स्कूबा स्नॉर्कलिंग, मटिरा बीच, लेपर्ड रेज या ठिकाणांना भेट देऊ शकता.