तुम्ही गर्भवती आहात, मग या वस्तूंचा वापर मुळीच करु नका…कुठल्या आहेत त्या वस्तू?
गर्भवती महिलांमध्ये 9 महिन्यात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. गर्भात एका चिमुकल्याला वाढविताना त्या आईला अनेक गोष्टी सोडाव्या लागतात. त्यात एक आवर्जून सोडण्याची गोष्ट म्हणजे सौंदर्य प्रसाधने. या सौंदर्य प्रसाधनांमधील रसायनांमुळे आई आणि बाळाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते असं स्त्रीरोगतज्ज्ञांचं म्हणं आहे.
Pregnancy Care सौंदर्य प्रसाधने ही महिलांच्या आयुष्यातील सगळ्यात प्रिय गोष्ट आहे. पण जेव्हा आपल्याला आई होण्याची चाहुल लागते. तेव्हा या सौंदर्य प्रसाधनापासून त्यांना दूर राहिला पाहिजे. ही सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. आणि या रसायनांचा धोका आई आणि बाळाच्या आरोग्याला असतो. गर्भवतीमध्ये या काळात हार्मोनल बदल होत असतात. याचा परिणाम त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग अशावेळी सौंदर्य प्रसाधनांबाबत महिलांनी जागृत राहणं गरजेचं आहे.
या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करु नका.
अँटी-एजिंग आणि काळे डाग यावर बाजारात असंख्य क्रीम्स मिळतात. आपण त्यांचा वापरही करतो. क्रीममध्ये रेटिनॉइड्सचा वापर केलेला असतो. जो की गर्भाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. तर गर्भवती महिलांमध्ये या दिवसात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. त्यामुळे अशाप्रकारे रसायनयुक्त क्रीम्स वापरल्यास महिलांना अँलर्जी होऊ शकते. त्यांचा त्वचेसाठी ही प्रसाधने हानीकारण ठरु शकतात. त्यामुळे रसायनांनी तयार झालेली कुठलीही सौंदर्य प्रसाधने गर्भवती महिलांनी वापरु नयेत.
डिओडोरंट्स आणि परफ्यूम्सचा वापर टाळा
अनेक महिलांना रोज डिओडोरंट्स आणि परफ्यूम वापरायला आवडतं. पण गर्भवती महिलांनी डिओडोरंट्स आणि परफ्यूमचा वापर करु नये. कारण याचा सुंगधाने महिलेला उलटी, मळमळ, चक्कर येणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. तसंच या सुंगधाने अँलर्जीची भीती असते.
थांबा केस काळे करत आहात..
हो तुम्ही गर्भवती असाल तर या 9 महिन्यात आणि त्यानंतर किमान वर्षभर तरी केस काळे करु नका. केस काळे करण्यासाठी महिला हेअर डाईचा वापर करतात. या हेअर डाईमध्ये अमोनियाचा वापर केला जातो. जो बाळासाठी हानिकारक आहे. त्यामुळे या दिवसात हेअर डाईचा वापर करु नका.
नेल पॉलिश लावू नका
गर्भवती महिलांनी नेल पॉलिश या दिवसांमध्ये वापरु नयेत. नेल पॉलिशमध्ये असलेले रसायन पोटात गेल्यास हे गर्भासाठी हानिकारक असतं. त्यामुळे नेल पॉलिश या दिवसात लावू नका.
गर्भवती महिलांनी यादिवसांमध्ये नैसर्गिक म्हणजे हर्बल प्रसाधनांचा वापर करावा. हेअर रंगासाठी हर्बल मेंहदीचा वापर करा. त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती गोष्टींचा वापर करा. त्वचेची निगा राखण्याकरिताही नैसर्गिक तेलांचा वापर करावा.
संंबंधित बातम्या :
Relationship Tips : नातं जपा, नातं जगा; तुमची ‘ही’ चूक वेळीच सुधारा!
Relationship : वैवाहिक जीवनात तणाव वाढलाय? मग शुक्र ग्रहाला कसं करणार खुश? जाणून घ्या एका क्लिकवर…