Hair Care : कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा !
डोक्यातील कोंडा एक सामान्य समस्या आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता. ज्यामुळे केसातील कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल.
डोक्यातील कोंडा एक सामान्य समस्या आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता. ज्यामुळे केसातील कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल.
Follow us
डोक्यातील कोंडा एक सामान्य समस्या आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता. ज्यामुळे केसातील कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल.
केसांतील कोंडा दूर करण्यासाठी नारळ तेल फायदेशीर आहे. यामध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत, जे डोक्यातील कोंडाची समस्या दूर करण्यात मदत करतात. आपण आठवड्यातून एकदा नारळाच्या तेलाने मालिश करू शकता.
अॅपल सायडर व्हिनेगर कोंड्याची समस्या कमी करण्यास देखील मदत करते. अॅपल सायडर व्हिनेगरचा अर्धा चमचा थंड पाण्यात मिसळा आणि केस धुतल्यानंतर केसांना लावा. यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते.
हळद, मध आणि दुधाचे मिश्रण तयार करून संपूर्ण केसांना लावा. थोडा वेळ मसाज करा आणि नंतर केसांना शैम्पूने धुवा. आपण आठवड्यातून दोनदा हे करू शकता. यामुळे केसातील कोंडा दूर होईल.
लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे डोक्यातील कोंडाची समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी, आपल्याला एक कप पाण्यात एक चमचे लिंबाचा रस मिसळावा लागेल. या मिश्रणाने केस धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)