साडी हा पारंपारिक पोशाख आहे. स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी तुम्ही तिरंगा साडी परिधान करू शकता. याशिवाय तुम्ही साडीवर तिरंगा पिन किंवा ब्रॉच लावू शकता.
स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी, तुम्ही स्वातंत्र्याचा नारा असलेले टी-शर्ट निवडू शकता. या टी-शर्टवर 'जय हिंद' डिझायनर शैलीत लिहिलेलं असतं. याशिवाय, तुम्ही पांढऱ्या टी-शर्टवर 'वंदे मातरम' लिहिलेला टी-शर्ट परिधान करू शकता. देशभक्ती दाखवणारा हा टी-शर्ट सर्वोत्तम मार्ग आहे.
या खास प्रसंगी तुम्ही तिरंगा दुपट्टा कॅरी करू शकता. तिरंगा दुपट्टाचा ट्रेंड कधीच जात नाही. तुम्ही पांढऱ्या सूटसह तिरंगा दुपट्टा परिधान करू शकता. ऑफिसला जाण्यासाठी हा लूक परफेक्ट आहे.
पारंपारिक कुर्त्यामध्ये पुरुषही नेहरू जॅकेट स्टाइल करू शकतात. नेहरू जॅकेट नेहमी ट्रेंडमध्ये असतात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पांढरा कुर्ता आणि जीन्सवर नारंगी रंगाचं नेहरू जॅकेट ट्राय करू शकता.
याशिवाय स्त्रिया अॅक्सेसरीजमध्ये तिन रंगाच्या बांगड्या, नेकपीस आणि कानातले वापरू शकतात.