मुंबई ते माळशेज - पावसाळ्यात माळशेज घाटाचे सौंदर्य आणखीनच वाढते. माळशेजमध्ये हिरवळ आणि सुंदर दृश्ये पहायला मिळतात. येथे अनेक धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले पाहू शकतात. आपण या सुंदर व्हॅलीमध्ये सर्व ताण आणि थकवा विसरून जाल.
आपण बंगलोर ते ऊटीपर्यंत रोड ट्रिप करु शकता. फोटोग्राफर्समध्ये हे खूप लोकप्रिय ठिकाण आहे, कारण येथे डोंगरांवर संपूर्ण हिरवळ दिसते. आपण बांदीपूर रिझर्व फॉरेस्टजवळ देखील थांबू शकता. येथे आपण वन्यजीव अनुभवू शकता.
चंदीगड ते कसौली - मान्सूनमध्ये चंदीगड ते कसौली अशी छोटी ड्राईव्ह प्लान करु शकता. दरम्यान, आपण पर्वतांच्या सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकता.
उदयपूर ते माउंट अबू - लेक सिटी उदयपूर ते राजस्थानमधील सर्वात प्रसिद्ध हिलस्टेशन माउंट अबूपर्यंत जाता येते. माउंट अबूच्या सभोवतालच्या पर्वतरांगा पर्यटनासाठी अद्भूत दृश्य आहे.