भारतात दैनंदिनपणे विकल्या जाणाऱ्या आणि लोकप्रिय ठरलेल्या अशा अनेक वस्तू (Product) आहेत ज्यावर परदेशात मात्र बंदी आहे. त्याचाच हा आढावा.
पेस्टिसाइड्स (किटकनाशके) : आपल्या देशात पिकांचं उत्पादन वाढावं आणि त्यावरील किटकांचा नायनाट व्हावा म्हणून अनेक किटकनाशकं वापरली जातात. मात्र, परदेशात जवळपास यातील 60 विषारी किटकनाशके विक्रीस बंदी आहे. ही किटकनाशकं फळ किंवा धान्यातून मानवी शरीरात जातात आणि अनेक आजारांचं कारण ठरतात.
उच्च-कॅफीनयुक्त पेयांमध्ये कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स आणि कोलासारखी इतर शीतपेये समाविष्ट आहेत. जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल, तर डॉ.राजच्या या ट्रिकनुसार तुम्ही दुपारी 12 नंतर कॅफीनचे सेवन थांबवावे.
जेली कँडी: या कँडीला भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पसंत करतात. मात्र, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये या कँडीवर विक्रीस बंदी आहे. या कँडी मुलांच्या आरोग्याला धोकादायक असतात असं या देशांच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
डिस्प्रिन: भारतात डोकं दुखायला लागलं की लगेच डिस्प्रिनची गोळी खाली जाते. मात्र, परदेशात यावर बंदी आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार ही गोळी आरोग्याला अपयाकारक आहे.
अनपॉइश्चराइज्ड मिल्क: भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या अनपॉइश्चराइज्ड दुधाचा वापर करण्यावर परदेशात बंदी आहे.
लाईफबॉय साबण : भारतात मोठी जाहिरात करुन लोकप्रिय ठरलेल्या लाईफबॉय साबणावर अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये बंदी आहे. हा साबण त्वचेसाठी घातक असल्याचं सांगितलं जातं. विकसित देशात हा साबण जनावरं धुण्यासाठी वापरला जातो.