विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी सर्वत्र होमहवन आणि महाआरती
world cup 2023 final | भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघातून क्रिकेट विश्वविजेता संघ ठरणार आहे. रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघात लढत होणार आहे. भरताच्या विजयासाठी देशभर होमहवन केले जात आहे. प्रार्थना आणि महाआरती केली जात आहे.
1 / 5
भारतीय संघाच्या विजयासाठी देशभर विविध उपक्रम सुरु आहे. पुणे शहरात विविध संघटनांकडून उपक्रम सुरु आहे. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडून होमहवन आणि महाआरती करण्यात आली. गणरायाला भारतीय संघाच्या विजयाचे साकडे घातले.
2 / 5
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शनिवारी होम हवन केले. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा विजय व्हावा, यासाठी मनसे विद्यार्थी सेनेने दगडूशेठ हलवाई गणपतीला प्रार्थना केली.
3 / 5
मनसेचे शेकडो कार्यकर्ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात एकत्र आले. त्यांनी गणरायाची आरती केली. भारताच्या विजयासाठी गणरायाला साकडे घातले. भारताचा झेंडा घेऊन भारतीय संघाच्या विजयासाठी गणपती मंदिरात जोरदार घोषणाबाजी केली.
4 / 5
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभिषेक करत गणरायाची प्रार्थना केली. हातात बॅट आणि क्रिकेट संघाचा ड्रेस परिधान करुन आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी महाआरती केली. त्यानंतर आलेल्या भविकांना प्रसादाचे वाटप केले.
5 / 5
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या 'शिवतीर्था'जवळ केळुस्कर मार्ग आणि एम.बी. राऊत मार्ग या जंक्शनवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया' सामना LIVE अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. मोठ्या पडद्यावर हा सामना पाहता येणार आहे.