Marathi News Photo gallery Mahesh babu daughter sitara in limelight after attending anant ambani radhika merchant wedding took photos with rekha aishwarya rai
अनंत-राधिकाच्या लग्नामुळे ‘ही’ 11 वर्षांची स्टारकिड आली प्रकाशझोतात; कोण आहे ती?
महेश बाबूची मुलगी सितारा ही 11 वर्षांची आहे. आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सितारासुद्धा चित्रपटसृष्टीत काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. वयाच्या अकराव्या वर्षीच सितारा एका प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँडचा चेहरा बनली आहे.
1 / 8
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये एका 11 वर्षांच्या स्टारकिडने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या स्टारकिडने किम कार्दशियनपासून रणवीर सिंहपर्यंत अनेकांसोबत फोटो क्लिक केले आहेत.
2 / 8
ही स्टारकिड दुसरी-तिसरी कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांची मुलगी सितारा आहे. वडील महेश बाबू आणि आई नम्रता शिरोडकर यांच्यासोबत ती अंबानींच्या लग्नसोहळ्याला पोहोचली होती.
3 / 8
सिताराने अंबानींच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींची भेट घेतली. त्यांच्यासोबत तिने सेल्फीसुद्धा क्लिक केले. यातील एका फोटोमध्ये ती बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनाससोबत दिसून आली.
4 / 8
याशिवाय तिने ऐश्वर्या राय बच्चनसोबतही फोटो क्लिक केला. या फोटोमध्ये ऐश्वर्याची मुलगी आराध्या आणि सिताराची आई नम्रतासुद्धा दिसत आहेत.
5 / 8
सिताराने बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबतही फोटो क्लिक केला आहे.
6 / 8
इतकंच नव्हे तर दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्यासोबतही तिने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रेखा यांनी सिताराला मिठी मारली आहे.
7 / 8
रणवीर सिंह आणि किम कार्दशियन यांच्यासोबतही सिताराने फोटो क्लिक केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सितारा ही टाइम्स स्क्वेअरवर झळकल्याने सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
8 / 8
काही दिवसांपूर्वीच ती टाइम्स स्क्वेअरवर झळकल्याने सोशल मीडियावर चर्चेत आली होती. आयुष्यातील पहिली कमाई दान केल्यामुळेही ती प्रकाशझोतात आली होती.