
साऊथ स्टार महेश बाबूची मुलगी सितारा सध्या तूफान चर्चेत आहे. कारण जे बाॅलिवूडच्या स्टार किड्सला जमले नाही ते महेश बाबूच्या लेकीने करून दाखवले आहे.

नुकताच सितारा हिने एक जाहिरात केली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीसाठी सितारा हिचे मोठ्या प्रमाणात काैतुक देखील केले जात आहे.

विशेष म्हणजे फक्त 11 वर्षांच्या सितारा हिने या जाहिरातीसाठी तगडी फिस देखील घेतली आहे. या एका जाहिरातीसाठी सितारा हिने तब्बल 1 कोटी फिस आकारली आहे.

जे सारा अली खान, अनन्या पांडे, सुहाना खान, जान्हवी कपूर, करिना कपूर यांना जे जमले नाही ते महेश बाबू यांच्या मुलीने करून दाखवले आहे.

आता सितारा हिच्या या जाहिरातीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी सिताराचे काैतुकही केले.