‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची होणार धमाकेदार एण्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेच्या कथानकात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण एका नव्या कलाकाराची या मालिकेत एण्ट्री होणार आहे. या अभिनेत्याच्या एण्ट्रीने मालिकेत कोणतं नवं वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Mar 27, 2024 | 9:10 AM
स्टार प्रवाह वाहिनीच्या 'मुरांबा' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षय आणि रमाची जोडी ही प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे. अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरतेय.

1 / 5
वेगवेगळी कारस्थानं करुन रमा आणि अक्षयला वेगळं करु पाहणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे. मालिकेत लवकरच रेवाचा नवरा म्हणजेच अथर्वची एण्ट्री होणार आहे. अभिनेता आशय कुलकर्णी रेवाच्या नवऱ्याची म्हणजेच अथर्वची भूमिका साकारणार आहे.

2 / 5
मुरांबा या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना आशय म्हणाला, "स्टार प्रवाह वाहिनीसोबत काम करण्याची इच्छा होती ती या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतेय. जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा मालिकेत काम करतोय. मुरांबा मालिकेत मी खलनायक साकारणार आहे."

3 / 5
"खलनायक साकारताना पात्र एका साच्यात अडकत नाही. त्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची मुभा असते. हळूहळू मला हे पात्र गवसत आहे. शशांक केतकरसोबत मी याआधी काम केलं आहे त्यामुळे आमची मैत्री होतीच. इतर कलाकारांसोबतही छान गट्टी जमली आहे. मुरांबा मालिकेच्या सेटवर खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यामुळे नवं कुटुंब मिळालं आहे असं म्हणता येईल," असंही तो म्हणाला.

4 / 5
अथर्वच्या येण्याने 'मुरांबा' या मालिकेत नेमकं कोणतं नवं नाट्य घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका दुपारी 1.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

अथर्वच्या येण्याने 'मुरांबा' या मालिकेत नेमकं कोणतं नवं नाट्य घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका दुपारी 1.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.