तब्बल 10 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन

'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही नवी मालिका येत्या 17 जूनपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवास वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये समीर परांजपे, शिवानी सुर्वे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Jun 03, 2024 | 1:51 PM
स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 17 जून पासून 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोमधून शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे म्हणजेच गायत्री आणि तेजस लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे गायत्री प्रभू.

1 / 5
गायत्रीचा माणसांपेक्षा पैशांवर जास्त विश्वास आहे. प्रभू कुटुंबाची भली मोठी वास्तू आणि प्रतिष्ठा पाहूनच तिने या घरची सून होण्याचा निर्णय घेतला. गायत्री हुशार आणि स्वावलंबी आहे. ती फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे. तिचा रेकॉर्ड आजवर कुणीच मोडलेला नाही.

2 / 5
गायत्रीला समोरच्या व्यक्तीला हरताना पाहायला आवडतं. ती कधीच कोणाला स्वत:समोर जिंकू देत नाही, त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. अभिनेत्री मानसी कुलकर्णी गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. 10 वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुकता असल्याची भावना मानसीने व्यक्त केली.

3 / 5
"गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्त्वाकांक्षा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. आपल्यापेक्षा वरचढ ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची सतत धडपड सुरु असते. त्यामुळेच गायत्रीला आव्हान देणारा तेजस आणि तिचा फिनिशिंग कॉलेजमधला रेकॉर्ड मोडू पहाणाऱ्या मानसीला ती अद्दल घडवू इच्छिते," असं मानसी म्हणाली.

4 / 5
याविषयी तिने पुढे सांगितलं, "गायत्रीचा लूक मला फारच आवडला. मुळात मला साडी नेसायला खूप आवडतं. गायत्रीच्या लूकसाठी डिझाइन केलेल्या साड्या फारच सुरेख आहेत. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात ही हटके व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे."

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.