स्नेहा वाघ कृष्णभक्तीत लीन; कामातून घेतला ब्रेक

| Updated on: Dec 29, 2023 | 9:06 AM

'ज्योती' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्नेहा वाघ हिने कामातून काही काळ ब्रेक घेतला आहे. ब्रेक घेऊन ती देवदर्शनाला निघाली आहे. द्वारका, सोमनाथ अशा देवस्थानांचं तिने दर्शन घेतलं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 6
33 वर्षांची अभिनेत्री स्नेहा वाघ गेल्या काही दिवसांपासून 'नीरजा' या मालिकेत काम करत होती. मात्र आता मालिकेतील तिची भूमिका संपुष्टात आल्याने तिच्याकडे नवीन काही प्रोजेक्ट्स नाहीत. त्यामुळे आता स्नेहा अध्यात्मिकतेकडे वळली आहे. आईसोबत ती द्वारका, सोमनाथच्या दर्शनाला गेली आहे.

2 / 6
स्नेहाने एका मुलाखतीत सांगितलं होतं, "जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा माझी आई एकटी पडली होती. ती स्वत:ला त्यातून सावरू शकत नव्हती. त्यामुळे मी तिच्यासाठी एका ट्रिपचं आयोजन केलं. आमच्यासोबत माझी मावशी आणि बहीणसुद्धा आहे. नीरजा मालिकेतील माझी भूमिका संपल्यानंतर मला पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे कामातून ब्रेक घेऊन मी त्यांच्यासोबत आले."

3 / 6
"द्वारका ही कृष्ण नगरी आहे. याठिकाणी आम्ही बऱ्याच मंदिरांचं दर्शन घेतलं. श्रीकृष्ण यांच्या जीवनाविषयी आम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या. याशिवाय सोमनाथ आणि नागेश्वर महादेव यांचंही दर्शन झालं", असं तिने पुढे सांगितलं.

4 / 6
स्नेहाने सध्या कामातून काही काळ ब्रेक घेतला असला तरी टीव्ही इंडस्ट्रीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला का, याविषयी तिने काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र देवदर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून तिने अभिनयाकडून अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.

5 / 6
स्नेहाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिने 2007 मध्ये अविष्कर दारवेकरशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यावेळी स्नेहा फक्त 19 वर्षांची होती. त्यानंतर 2015 मध्ये तिने अनुराग सोलंकीशी लग्न केलं. लग्नाच्या वर्षभरातच हे दोघं विभक्त झाले.

6 / 6
स्नेहा वाघ हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘ज्योती’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. यानंतर तिने ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेत ‘मुरा’ची भूमिका साकारली. बिग बॉस मराठीमध्ये ती आणि अविष्कार स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.