गोल्डन दुधाचे महत्त्व
दुधामध्ये सुकामेवा घालून प्या. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
आल्याचे दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन, लोह, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत.
दुधामध्ये भोपळ्याच्या, सूर्यफूलाच्या बिया घाला. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
झोपण्याआधी कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे रात्री चांगली झोप येते. गरम दुधामुळे शरीराला आरामही मिळतो. अभ्यासानुसार, कॅल्शियमयुक्त दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ स्नायूंना आराम देण्यास आणि तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.