आरसीबीचा खेळाडू मोहम्मद सिराज याच्या घरी 'बिर्याणी पार्टी' आयोजित करण्यात आली होती. यासाठी आरसीबीचे सर्व खेळाडू पोहोचले होते. आरसीबीच्या ट्विटर हँडलवर या पार्टीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
मोहम्मद सिराज याला खूप संघर्ष करावा लागलाय. त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सिराजने क्रिकेटमध्ये कमवलेल्या पैशातून सर्वात आधी स्वतचे नवीन घर घेतले होते.
मोहम्मद सिराज विराट कोहलीला आपला मेंटर समजतो. त्यामुळे दोघांमध्ये वेगळं बॉन्डिंग आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत.
विराट कोहली सोबत आरसीबीची संपूर्ण टीम सिराजच्या घरी पोहोचली. सिराजच्या घरी खास बिर्याणी पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं.
मोहम्मद सिराज आरसीबीच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. संघाचा तो स्ट्राईक बॉलर आहे.