अंबानी-अदानी किंवा टाटा नाही तर या मुंबईकराने घेतला देशातील सर्वात महागडा फ्लॅट, किंमत इतकी की पूर्ण गावच घेतले असते

Most Expensive Flat in India: जेव्हा देशातील सर्वात महाग घराची चर्चा होणार तेव्हा मुकेश अंबानी यांच्या एंटीलियाचे नाव समोर येते. मुंबईतील दक्षिण भागात असलेल्या अल्टामाउंट रोडवर असलेल्या मुकेश अंबानी यांच्या एंटीलियाची किंमत 12 ते 15 हजार कोटी रुपये आहे. 27 मजली असलेल्या या घरामध्ये हेलिपॅड, स्विमिंग पूल, थिएटर, शेकडो वाहनांसाठी पार्किंग अशा अनेक सुविधा आहेत.

| Updated on: Sep 26, 2024 | 9:01 AM
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आता देशातील सर्वात महागड्या फ्लॅटचा सौदा झाला आहे. 369 कोटी रुपयांचा हा फ्लॅट आहे. देशातील सर्वात महागड्या अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट विकला गेला आहे.  दक्षिण मुंबईतील मलबार हिल्सवरील एका शे-फेसिंग अपार्टमेंटमध्ये सर्वात महागडा सौदा करण्यात आला आहे.

1 / 7
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, लोढा ग्रुपची कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सने हा लक्झरी अपार्टमेंट तयार केला आहे. लोढा मलबार सुपर लक्झरी रेसिडेन्शिअलचा हा अपार्टमेंट देशातील सर्वात महागडा फ्लॅट मानला जातो. आता तुम्हाला वाटत असणार मुकेश अंबानी, गौतम अदानी किंवा रतन टाटा सारख्या मोठ्या उद्योगपतींनी हा सर्वात महागडा फ्लॅट घेतला असेल तर तुमची चूक आहे.

2 / 7
प्रसिद्ध उद्योगपती जे.पी. तापडिया यांनी देशातील सर्वात महागडा फ्लॅट घेतला आहे. तापडिया कुटुंबाने लोढा मलबार सुपर लक्झरी निवासी टॉवरमध्ये 26व्या, 27व्या आणि 28व्या मजल्यावर ट्रिपलेक्स फ्लॅट खरेदी केले आहेत.

3 / 7
1.08 एकरमध्ये हे अपार्टमेंट पसरले आहे. त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. फ्लॅटच्या ड्रॉईंग रूम आणि बेडरूममधून अरबी समुद्राच्या लाटांचे सुंदर दृश्य दिसते. आलिशान फ्लॅटचे आतील भाग पाहण्यासारखे आहेत.  ट्रिपलेक्स अपार्टमेंटचे कार्पेट एरिया 27,160 स्क्वेअर फूट आहे.

4 / 7
लोढा मलबार प्रकल्पाचे आर्किटेक्चर हाफिज कॉन्ट्रॅक्टर या जगातील अव्वल आर्किटेक्चर कंपनीने तयार केले आहे. इंटीरियरचे काम स्टुडिओ एचबीएने केले आहे. तापडिया कुटुंबियांनी या फ्लॅटसाठी 19.07 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले होते.

5 / 7
जे.पी. तापडिया हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांनी 1990 मध्ये फेमी केअरची स्थापना केली. त्यांनी ही कंपनी इतकी मोठी केली की आज फेमी केअर ही जगातील सर्वात मोठी कॉपर-टी उत्पादन करणारी कंपनी आहे.  यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये 11,000 स्क्वेअर फुटांचे डुप्लेक्स अपार्टमेंट 60 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

6 / 7
बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनीही त्याच अपार्टमेंटमध्ये 29व्या, 30व्या आणि 31व्या मजल्यावर ट्रिपलेक्स खरेदी केले होते, ज्यासाठी त्यांनी 252.5 कोटी रुपये दिले होते.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.