ट्रेंडिंगमध्ये असलेली टॉप 10 ठिकाणं; भटकंतीची आवड असणाऱ्यांनी यादी नक्की पहा
या वर्षात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या टॉप 10 शहरांची यादी समोर आली आहे. पर्यटकांची आवड आणि निवड कोणत्या शहरांना सर्वाधिक आहे, हे या यादीतून स्पष्ट होतंय. जपान, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम या देशांमधील ही खास शहरं आहेत.
1 / 11
गेल्या काही वर्षांत लंडन आणि पॅरिस हे फिरण्यासाठी सर्वांत लोकप्रिय ठिकाण मानले गेले आहेत. मात्र 2024 चा ट्रॅव्हल ट्रेंड पाहता, सध्या लोक आशियातील काही शहरांकडे अधिक वळल्याचं दिसून येत आहे. 'ट्रिपअॅडवाइजर'ने 2024 मधील जगातील टॉप ट्रेंडिंग ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. यात टॉप 10 मध्ये कोणती शहरं आहेत, ते पाहुयात..
2 / 11
जपानमधील टोक्यो हे या यादीत पहिल्या स्थानी असून अनेकांची या शहराला पसंती आहे. गेल्या नऊ महिन्यात जपानमधील फिरण्याची ठिकाणं सर्वाधिक सर्च केली गेली आहेत.
3 / 11
या यादीत दुसऱ्या स्थानी सेऊल हे दक्षिण कोरियातील शहर आहे. के-पॉप, कोरियन ड्रामा आणि कोरियन ब्युटी यांबद्दलची क्रेझ जगभरात वाढतेय. यात बीटीएस या के-पॉप बँडचं विशेष योगदान आहे.
4 / 11
तिसऱ्या स्थानी व्हिएतनाममधील हालाँग बे आहे. व्हिएतनामचे ट्रॅव्हल पॅकेज स्वस्त असल्याने पर्यटकांचा ओढा याठिकाणी वाढत आहे.
5 / 11
या यादीत चौथ्या स्थान फिलिपिन्समधील पलावान आयलँड आहे. ज्यांना निसर्गसौंदर्यात रममाण व्हायला आवडतं, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
6 / 11
व्हिएतनाममधील सापा हे ठिकाण या यादीत पाचव्या स्थानी आहे. उत्तर व्हिएतनामच्या पर्वतरांगामध्ये स्थित असलेलं हे अत्यंत नयनरम्य ठिकाण आहे.
7 / 11
कोलंबियामधील बोगोटा हे शहर सहाव्या स्थानी आहे. या शहराला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. बोगोटा ही कोलंबियाची राजधानी असून सर्वांत मोठं शहर आहे. बोगोटा हे कोलंबियाचं आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे.
8 / 11
थायलँडची राजधानी बँकॉकनंतर पटाया हे दुसरं प्रमुख पर्यटनस्थळ आहे. या यादीत हे शहर सातव्या स्थानी आहे. पटायामधील नाईट-लाइफ पर्यटकांना विशेष आकर्षित करते.
9 / 11
कोस्टा रिकामधील अलाजुएला हे शहर विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रॅव्हलिंगसाठी टॉप 10 शहरांच्या यादीत अलाजुएला आठव्या स्थानावर आहे.
10 / 11
या यादीत नवव्या स्थानी कंबोडियामधील नोम पेन्ह हे शहर आहे. ही कंबोडियाची राजधानी असून सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. ऐतिहासिक वास्तुकला आणि इतर आकर्षणांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.
11 / 11
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर या यादीत दहाव्या स्थानी आहे. हे शहर मलेशियाचं सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय केंद्र आहे. 1990 पासून या शहराने राष्ट्रकुल खेळ, दक्षिणपूर्व आशियाई खेळ यांसह अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं यजमानपद भूषवलं आहे.