आज अर्थात 29 मार्च रोजी देशभरात होळीचा सण धूम धडाक्यात साजरा केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्या शैलीत हा रंगांचा हा सण साजरा करत असतो. हा धमाल मजेचा उत्सव देशाच्या प्रत्येक भागात साजरा केला जातो.
त्यातच आज मिस्टर अँड मिसेस चांदेकरनं मस्त होळी साजरी केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे या दोघांची लग्नानंतर ही पहिली होळी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही होळी अधिक खास ठरली आहे.
सोबतच सिद्धार्थनं 3 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर मस्त धुमाकूळ घालत आहेत.