एका अरेंज मॅरेजची गोष्ट.. असं जमलं मृणाल दुसानिसचं लग्न

'माझिया प्रियाला प्रित कळेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली. लग्नानंतर परदेशात वास्तव्यास असलेली मृणाल काही दिवसांपूर्वीच भारतात आली.

| Updated on: May 03, 2024 | 12:00 PM
माझिया प्रियाला प्रित कळेना, हे मन बावरे, तू तिथे मी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री मृणाल दुसानिसने करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं.

माझिया प्रियाला प्रित कळेना, हे मन बावरे, तू तिथे मी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री मृणाल दुसानिसने करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं.

1 / 6
2016 मध्ये तिने अरेंज मॅरेज केलं आणि त्यानंतर ती पतीसोबत परदेशी स्थायिक झाली. आता लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर ती मायदेशी परतली आहे. 'सेलिब्रिटी कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे.

2 / 6
"माझ्या बाबांच्या ओळखीतल्या एका काकांनी आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं. त्यानंतर एके दिवशी मला त्याचा फोन आला. आमचं एकमेकांशी बोलणं झालं. मग आम्ही भेटायचं ठरवलं होतं. आमचं अरेंज मॅरेज आहे", असं मृणालने सांगितलं.

3 / 6
"आई-बाबा जे स्थळ सुचवतील ते चांगलंच असणार याची मला खात्री होती. म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला. फोनवर बोलणं झाल्यानंतर तो अमेरिकेहून इथे भेटायला आला. त्यावेळी आम्ही बाहेर कुठे गेलो नाही. घरातच थोडा वेळ बोललो. त्यानंतर पुढचे सहा महिने आम्ही संपर्कात होतो", असं ती पुढे म्हणाली.

4 / 6
नीरजच्या संपर्कात राहिल्यानंतर मृणालला खात्री पटली की जोडीदार म्हणून हा मुलगा चांगला आहे. त्यानंतर एकदा कार्यक्रमासाठी ती परदेशी गेली असता नीरज तिला भेटायला आला होता. त्यावेळी त्यांचं लग्न आधीच ठरलेलं होतं. अशा साध्या सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी जुळून आल्याचं मृणालने सांगितलं.

5 / 6
मृणाल गेल्या चार वर्षांपासून पती आणि मुलीसोबत परदेशात वास्तव्यास होती. नीरज आणि मृणालला नुर्वी ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच ती पती आणि मुलीसह भारतात परतली.

मृणाल गेल्या चार वर्षांपासून पती आणि मुलीसोबत परदेशात वास्तव्यास होती. नीरज आणि मृणालला नुर्वी ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच ती पती आणि मुलीसह भारतात परतली.

6 / 6
Follow us
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.