Mumbai Rain: कुठे टिप टिप तर कुठे धो धो! काय म्हणतोय मुंबईचा पाऊस, बघा फोटो

| Updated on: Jul 14, 2023 | 10:14 AM

हवामान खात्याने आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर असाच पाऊस सुरू राहिल्यास तर सखल भागात पाणी तुंबण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

1 / 5
मुंबई उपनगर सह अंधेरी मध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ठाण्यात पावसाची रिपरिप. गेले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा पाऊस  जोर वाढला. अचानक पडलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबई उपनगरातील सर्व भागात जोरदार पाऊस.

2 / 5
हवामान खात्याने आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर असाच पाऊस सुरू राहिल्यास तर सखल भागात पाणी तुंबण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

हवामान खात्याने आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर असाच पाऊस सुरू राहिल्यास तर सखल भागात पाणी तुंबण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

3 / 5
सध्या अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आहे. पोलिसांनी अंधेरी सभेच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड करून बंद केला आहे. सध्या कोणत्याही वाहनाला आत प्रवेश दिला जात नाही.

4 / 5
भुयारी मार्गाच्या पाणी पंपिंग मशीनद्वारे काढण्याचे काम बीएमसीचे कर्मचारी सतत करत आहेत. मात्र पावसाचा जोर वाढल्याने भुयारी मार्गात सतत पाणी तुंबत आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहने थांबवण्यात आली असून, एसबी रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

5 / 5
वसई विरार नालासोपाऱ्यात रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पाऊस सुरू. आज सकाळ पासूनच रिमझिम पावसाला सुरवात. वसई विरार शहरात कुठेही पाणी साचले नसून सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे