‘मुंज्या’मध्ये दिसलेलं महाराष्ट्रातील सुंदर गाव; मान्सून ट्रिपसाठी सर्वोत्तम पर्याय
अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'मुंज्या' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटासोबतच त्यातील लोकेशन्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर गावी या चित्रपटाचं शूटिंग पार पडलंय.
1 / 5
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग हे कोकणात झालंय. तिथला समुद्रकिनारा, कोकणातील गाव हे सर्व या चित्रपटात पहायला मिळतं. 'मुंज्या'मध्ये दिसलेल्या या सुंदर गावात तुम्ही तुमच्या मान्सून ट्रिपचं प्लॅनिंग करू शकता.
2 / 5
'मुंज्या'चं शूटिंग कोकणातील कुडाळ आणि चिपळूणमधील गुहागर याठिकाणी झालं आहे. पावसाळ्यात हे ठिकाण खूपच सुंदर दिसतं. इथलं निसर्गसौंदर्य अक्षरश: प्रेमात पाडणारं आहे. गुहागरचा समुद्रकिनारा पाहून तुमचा सर्व थकवा एका क्षणात दूर होईल.
3 / 5
पावसाळ्यात कोकण किनारपट्टीचं सौंदर्य आणखी खुलून येतं. 'मुंज्या' या चित्रपटाची कथा कोकणातील असल्याने त्याचं बहुतांश शूटिंग तिथेच झालंय. यामध्ये सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, शर्वरी वाघ यांसारख्या मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
4 / 5
कोकण हा किनारी भागात असल्याने त्याठिकाणी जास्त पाऊस असतो. त्यामुळे तिथे मान्सून सहलीचं नियोजन करताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. कुटुंबीय किंवा मित्रमैत्रिणींसोबत भेट देण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे.
5 / 5
'मुंज्या'बद्दल बोलायचं झाल्यास, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाची कमाई 105.95 कोटी रुपये इतकी झाली आहे.