Marathi News Photo gallery Narendra Modi Narendra Modi became the first passenger of Pune Metro Modi's Pune Metro journey with the disabled
Narendra Modi | पुणे मेट्रोचे पहिले प्रवासी ठरले नरेंद्र मोदी, दिव्यांगांसोबत मोदींचा पुणे मेट्रो प्रवास
पुण्यातील पहिल्या मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं.
पुणे मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Follow us
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) आज पुणे (pune) दौऱ्यावर आहेत. बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) त्यांच्या हस्ते ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं.
गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला. तत्पूर्वी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.
पुणे मेट्रोचे एकूण अंतर हे 32.2 किलोमीटर आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 किलोमीटरच्या पट्ट्यात प्रवास केला. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी तिकीट खरेदी केले. दिव्यांगांसोबत मोदींचा पुणे मेट्रो प्रवास. मोदींनी दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचा प्रवास गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा केला. यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती आपल्यासोबत अशी गप्पा मारते, हे पाहून विद्यार्थीही भारावून गेले.