Photo Gallery : नाशिकमध्ये जीवघेणी पतंगबाजी, 16 पक्षी जखमी…!
नाशिक जिल्ह्यात मकरसंक्रांत अक्षरशः जीवघेणी ठरलीय. शहरात नायलॉन मांजामुळे गळे चिरल्याच्या अनेक घटना घडल्या. गेल्या काही दिवसांमध्ये दोन कबुतरांसह घार, घुबड, कावळा, आयबीस, बगळा असे 16 पक्षी शहरात जखमी झाले असून, त्यापैकी 13 जणांना जीवदान दिले, तर एका घुबडाचा मृत्यू झालाय. गेल्या वर्षी शहरात 173 पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी झाले. यंदा शहर पोलीस आणि विविध सामाजिक संस्थांनी नायलॉन मांजा वापरू नये म्हणून जनप्रबोधन केले. इको एको फाउंडेशनचे 15 सदस्य शहरात जखमी पक्ष्यांना शोधून त्यांना उपचारार्थ अशोकस्तंभ येथील पशूवैद्यकीय रुग्णालयात दाखल करत आहेत. तर पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर व 30 विद्यार्थी तत्काळ जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहेत. हे पाहता आपण सारे शहाणे होऊयात. नायलॉन मांजा वापरणे टाळूया. संक्रांत जीवघेणी होण्यापासून वाचवूया.
Most Read Stories