'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधील लाडकी नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडे म्हणाली, "मला चुलत भाऊ आहेत. डोंबिवलीत माझे मावस आणि आत्ते भाऊ आहेत, तेव्हा आम्ही भाऊबीज तिकडेच साजरी करणार आहोत. पण अनेक वर्ष शिक्षणासाठी बाहेर राहिल्यामुळे बरेच वेळा भाऊबीज करता आली नाही. जेव्हा आम्ही एका शहरात असतो आणि आम्हाला सुट्टी असते आम्ही न चुकता एक घर ठरवतो आणि सर्व भावंडं एकत्र जमतो, तिथे आम्ही एकत्र भाऊबीज साजरी करतो. आम्ही जवळपास 20-25 भावंडं आहोत. माझे भाऊ माझ्यापेक्षा लहान आहेत, मी त्यांना सांगते की तुम्हाला जे हवे त्याची मला लिंक पाठवा आणि मी त्यांच्यासाठी ते ऑर्डर करेन."