कॉर्डेलिया क्रूझवर लीला करणार एजेला प्रपोज; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा धमाकेदार एपिसोड

पारंपरिक टेलिव्हिजन निर्मितीच्या सीमांना ओलांडून आणखी एक नवीन उपक्रम करून झी मराठीने प्रेक्षकांसाठी एक सरप्राइज आणलं आहे. हा विशेष भाग प्रेक्षकांना लवकरच पाहता येणार आहे. 'नवरी मिले हिटलरला' ही मालिका रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Sep 27, 2024 | 12:03 PM
याआधी आपण अनेकदा पाहिलंय की मालिकांचं शूट कुठच्या तरी समुद्र किनाऱ्यावर, हॉटेलमध्ये, किंवा इतर कुठल्या निसर्गरम्य ठिकाणी झालं आहे. पण यावेळी चक्क एका मालिकेचं शूटिंग हे समुद्राच्या मध्यभागी झालं आहे आणि हे सगळं घडलं आहे आलिशान ‘कॉर्डेलिया क्रूझवर’.

1 / 7
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मराठी टेलिव्हिजनवरील पहिली मालिका ठरली आहे, ज्याचं शूट क्रूझवर झालं आहे. मोकळं आकाश, पौर्णिमेचा चंद्र, थंडगार वारा आणि खाली निळाशार अथांग समुद्र अशा रोमँटिक वातावरणात प्रेक्षकांची आवडती जोडी एजे आणि लीला कॉर्डेलिया क्रूझवर होती.

2 / 7
लीला तिच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट एजेला या क्रूझवर सांगणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील खूप महत्वाच्या टप्प्याचं चित्रीकरण या क्रूझवर पार पडलं.

3 / 7
अथांग समुद्राला साक्षी ठेऊन लीलाने एजेला या क्रूझवर प्रपोज केलंय. पण इथे कथेत प्रेक्षकांना ट्विस्ट पहायला मिळणार आहे. लीलाच्या तीन सुना तिचं हे प्रपोजल हाणून पडण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा भाग टीव्ही स्क्रीनवर पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय असणार आहे.

4 / 7
या सहलीसाठी क्रूजवर फक्त एजे-लीला नाही तर संपूर्ण जहागीरदार कुटुंब पोहोचलं आहे. दोन दिवसांच्या शूटिंगमध्ये, कलाकार आणि टीमने अनेक आव्हानांचा सामना केला, पण त्यांनी प्रेक्षकांना अद्भुत अनुभव मिळावा यात कुठेच कमतरता ठेवली नाही.

5 / 7
वल्लरी विराजने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं "मी पहिल्यादांच क्रूजचा अनुभव घेतला आणि क्रूजवर शूटिंगचा अनुभव तर खूपच कमाल होता. आम्ही एजे-लीलाचा एक सीन शूट केला जिथे लीला एजेला प्रपोज करते. क्रूझवर शूटिंग केल्याने यामध्ये एक विशेषता जोडली गेली आहे."

6 / 7
"शूटिंग व्यतिरिक्त संपूर्ण टीमने खूप मज्जा केली आणि जितकं एक्स्प्लोर करता आलं तितकं केलं. आशा आहे की शूट करताना जितकी मज्जा आम्हाला आली तितकाच आनंद प्रेक्षकांनाही लवकरच मिळेल", असं वल्लरी म्हणाली.

7 / 7
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.