Marathi News Photo gallery Ncp chief & deputy cm ajit pawar cast his vote along with wife mother family at katewadi polling booth for baramati loksabha election 2024
Ajit Pawar : मतदानासोबत मुलाचं कर्तव्य, पहा अजित पवारांचे मतदान केंद्रावरचे खास Photos
Ajit Pawar : अजित पवार पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करतात. अनेकदा ते सकाळीच अधिकाऱ्यांसोबत विकास प्रकल्पांचे पाहणी दौरे करत असल्याच दिसून आलय. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे अजित पवार यांनी आज सकाळीच सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
आशाकाकींचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी भेटीनंतर दिली आहे
Follow us
आज देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. 11 राज्यातील लोकसभेच्या एकूण 93 जागांवर मतदान होतय. महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होतय. यात बारामती लोकसभेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची आहे.
अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर पत्नी सुनेत्रा पवार आणि आईसोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी ते आईला सोबत घेऊन आले होते.
बारामतीमध्ये यंदा चुरशीची निवडणूक आहे. पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. काका-पुतण्यामधील ही लढाई आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहे. महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिली आहे.
4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. बारामतीच्या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. भविष्य, प्रतिष्ठा या दृष्टीने बारामती लोकसभेची निवडणूक दोन्ही पवारांसाठी महत्त्वाची आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात यावेळी सगळे रंग पहायला मिळाले. आरोप-प्रत्यारोप, भावनिक आवाहन, अश्रू, विकासाचे मुद्दे हे सगळं यावेळी दिसलं.