माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता?

सत्यदीपने आधी अभिनेत्री अदिती राव हैदरीशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. एकीकडे मधू मंटेनाने इरा त्रिवेदीशी दुसरं लग्न केलं. तर अदितीने नुकताच ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थशी साखरपुडा केला आहे.

| Updated on: May 12, 2024 | 5:40 PM
अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. मसाबाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसरं लग्न केलं. याआधी तिने निर्माता मधू मंटेनाशी पहिलं लग्न केलं होतं. आता नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी मुलीचं पहिलं लग्न अपयशी ठरण्यामागचं सांगितलं आहे.

1 / 5
"मी सांगते, माझी चूक काय होती. जेव्हा मसाबाचं लग्न झालं होतं, तेव्हा तिला खरंतर लग्न करण्याची इच्छा नव्हती. तिला तिच्या पहिल्या पतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. मात्र त्यावेळी कुठेतरी माझी आईची भूमिका मध्ये आली", असं त्यांनी सांगितलं.

2 / 5
याविषयी त्या पुढे म्हणाल्या, "मी तिला म्हटलं की नाही.. तू त्याच्यासोबत लग्न केल्याशिवाय एकत्र राहू शकत नाही. माझी खरी चूक तीच होती. ते दोघं माझ्यामुळेच विभक्त झाले. मी खूप निराश झाले होते. पण दोघांमध्ये जर जमलं नाही तर आपण तरी काय करू शकतो."

3 / 5
"मसाबाने जेव्हा मला घटस्फोटाविषयी सांगितलं, तेव्हा जवळपास मी महिनाभर सुन्न होते. तो खूप कठीण काळ होता", अशा शब्दांत नीना गुप्ता व्यक्त झाल्या. मसाबाने 2015 मध्ये निर्माता मधू मंटेनाशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघं विभक्त झाले.

4 / 5
फॅशन इंडस्ट्रीत मसाबाचं खूप मोठं नाव आहे. ‘हाऊस ऑफ मसाबा’ हा तिचा फॅशन ब्रँडसुद्धा प्रसिद्ध आहे. मसाबा ही नीना आणि माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. मात्र या दोघांनी लग्न केलं नाही.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.