Marathi News Photo gallery Netizens curious about Pataudi Princely State flag hoisted on tomb of Saif Ali Khans Pataudi Palace details inside
सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसवर हा कोणता झेंडा? नेटकऱ्यांना पडला प्रश्न
सैफ अली खान आणि करीना सध्या त्यांच्या मुलांसोबत भोपाळमधील पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या व्हेकेशनचे काही फोटो करीनाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये पतौडी पॅलेसवर एक झेंडा फडकताना पहायला मिळतोय. त्याविषयी नेटकऱ्यांनी कुतूहल व्यक्त केलं आहे.
1 / 8
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मुलाबाळांसोबत हे दोघं भोपाळमधील पतौडी पॅलेसमध्ये राहायला गेले आहेत. करीनाने या पॅलेस व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
2 / 8
आमच्याच बागेतील मक्के की रोटी, सरसों दा साग.. असं कॅप्शन देत तिने खाण्याच्या पदार्थांचेही फोटो पोस्ट केले आहेत. या काही माझ्या आवडत्या गोष्टी आहेत, असंही तिने कॅप्शनमध्ये सांगितलंय. मात्र या सीरिजमधील शेवटच्या फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं.
3 / 8
या फोटोमध्ये पतौडी पॅलेसकडे जाताना सैफ अली खान दिसतोय. मात्र पॅलेसवरील झेंड्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पतौडी पॅलेसवर देशाचा तिरंगा नव्हे तर दुसराच कोणता तरी झेंडा पाहून नेटकऱ्यांनी कुतूहल व्यक्त केलं आहे. हा झेंडा कोणता आहे आणि कोणाचा आहे, असे प्रश्न नेटकरी करत आहेत.
4 / 8
पतौडी पॅलेसवर फडकणारा हा झेंडा पतौडी संस्थानचाच आहे. 1804-1948 दरम्यान हा झेंडा वापरण्यात आला होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पतौडी संस्थान भारतात विलीन झालं होतं.
5 / 8
आता सैफ अली खान हा पतौडींचा वारसदार असल्याने त्याला तो झेंडा वापरण्याचा अधिकार आहे. म्हणून आजही या आलिशान महालावर पतौडींचा झेंडा फडकत आहे.
6 / 8
पतौडी संस्थानचे पहिले नवाब हे सैफ अली खानचे पूर्वज फैज तलब खान होते. जे अफगाणिस्तानातून भारतात आले होते. काही दिवसांपूर्वीच पतौडी पॅलेस चर्चेत आला होता. रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटाची शूटिंग याच पॅलेसमध्ये झाली होती.
7 / 8
सैफ अली खानच्या कुटुंबाने या पतौडी पॅलेसला एका हॉटेलसमूहाला भाडेतत्वावर वापरण्यासाठी दिला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी हा करार रद्द करून ‘पतौडी पॅलेस’ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे.
8 / 8
माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या खूप आठवणी या पॅलेसशी जोडल्या आहेत, असं सैफ एका मुलाखतीत म्हणाला होता. हा पॅलेस आमच्यासाठी खूप अनमोल असून, याची कोणीही किंमत ठरवू शकत नाही, त्यामुळे आत तो कायम आमच्या जवळच राहील, असे तो म्हणाला होता.