रेशन कार्ड तयार करायचेय, नियम बदलले, आता ‘या’ कागदपत्रांची गरज लागणार
Ration Card | देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशनकार्ड तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत. त्यानुसार नवीन रेशनकार्ड तयार करण्यासाठी किंवा रेशनकार्डाचे नुतनीकरण करण्यासाठी 10 प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत.
Follow us
रेशन कार्ड हा तुमच्या ओळखीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. रेशन कार्ड ओळखपत्र आणि पत्ता पुरावा म्हणून देखील वापरता येते. नवीन गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी, सिम कार्ड मिळवण्यासाठी आणि मतदार ओळखपत्र मिळवण्यासारख्या इतर महत्त्वाच्या कामांसाठी तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा वापर करू शकता.
नव्या रेशनकार्डासाठी कुटुंबप्रमुखाचा एक पासपोर्ट साईज फोटो गरजेचा आहे. तुमच्याकडे जुनं रेशनकार्ड असेल तर ते रद्द झाल्याचे प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. याशिवाय, कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्सही गरजेची आहे.
कुटुंबप्रमुखाच्या नावावर असलेल्या गॅस पासबुकची झेरॉक्स गरजेची आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाच्या आधार कार्डाची फोटोकॉपी गरजेची आहे. कुटुंबातील सदस्यांचा जन्माचा दाखला, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र आता बंधनकारक आहे.
रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्या कुटुंबप्रमुखाच्या जातीचा दाखला आणि संबंधित कागदपत्रे गरजेची असतील. दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांचे प्रमाणपत्र जमा करावे लागेल.
कुटुंबप्रमुख मनरेगा जॉब कार्डधारक असेल त्याची फोटोकॉपी गरजेची आहे. उत्पन्नाच्या दाखल्याचा पुरावा बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच पत्त्याचा दाखला म्हणून लाईट बिल, घराच्या भाड्याची पावती किंवा अॅग्रीमेंट जमा करणे बंधनकारक आहे.