सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. मात्र वर्षभर ओढावलेलं कोरोनाचं संकट आणि वर्षाअखेरीस आलेला कोरोनाचा नवा अवतार, त्यामुळे सर्व सेलिब्रेशनवर बंधनं आली आहेत.
तुम्ही न्यू ईयर सेलिब्रेशन करण्याचा बेत आखत असाल किंवा त्याची तयारी पूर्ण केली असेल तर थोडं सबूर धरा. कारण राज्य सरकारने काही नियम आणि अटी घातल्या आहेत.
रात्री 11 नंतर हॉटेल, पब, बार बंद राहणार असून राज्यात सर्वांना संचारबंदीच्या नियमांचं पालनही करावं लागणार आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हवर 5 पेक्षा अधिक लोकांना जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
कोरोनाचं संकट अजूनही उभं आहे. हे लक्षात ठेवून नवीन वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणाने आणि शांततेत साजरं करावं, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं.
रात्री 11 नंतर हॉटेल, पब्स, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. याचा अर्थ तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही, असं नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे जायचं असेल तर रात्री 11 नंतर जाऊ शकता.
फक्त सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
मुंबईत दरवर्षी थर्टीफर्स्टला ज्या ठिकाणी गर्दी होते, त्याबाबत सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह यासारख्या ठिकाणीही ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा म्हणजे जे नियम यापूर्वी लागू होते ते 31 जानेवारीपर्यं कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नववर्षाबाबत नियम कोणते?