Photo Gallery : हौसेला नाही मोल, डोहाळं जेवण गायीचे अन् कौतुक अख्ख्या गावाला
पुणे : शेतकरी पोटची लेकरं आणि जनावरं यामध्ये कोणताही फरक नाही. पोटच्या गोळ्याप्रमाणेच जनावरांची जोपसणा करुन काळ्या मातीचं आणि गायींच ऋण फेडण्याचा त्याचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेनवडी येथील शेतकऱ्याने तर गायीच्या डोहाळे जेवणाचा असा दिमखदार कार्यक्रम केला आहे त्याची चर्चा सबंध पंचक्रोशीत सुरु आहे. चव्हाण शेतकरी कुटुंबाने हा अगळा-वेगळा उपक्रम राबलेला आहे. एखाद्या सुवासिनीचा डोहाळे जेवणाला लाजवेल अशा थाटात गायीच्या डोहाळे जेवणाचा हा कार्यक्रम पार पडला.या वेळी भजनाच्या कार्यक्रमाच देखील आयोजन करण्यात आलं होतं.गायीच्या डोहाळ जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी हजेरी लावली होती.
Most Read Stories