Marathi News Photo gallery Not kapoor khan or bachchan family but this celebrity family is indias richest family know about them
कपूर, खान किंवा बच्चन नाही तर ‘हे’ भारतातील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंब
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वांत श्रीमंत कुटुंब कोणतं असा प्रश्न विचारल्यास कपूर, खान किंवा बच्चन ही नावं अनेकजण घेतील. मात्र यांपेक्षाही श्रीमंत असलेलं फिल्मी कुटुंब दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आहे. हे कुटुंब कोणतं, त्यांच्या किती पिढ्या सिनेसृष्टीत कार्यरत आहेत आणि त्यांची संपत्ती किती हे पाहुयात..
1 / 8
भारतातील फिल्म इंडस्ट्री ही सर्वांत मोठी आणि यशस्वी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीत असे बरेच कुटुंब आहेत जे अनेक पिढ्यांपासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. या कुटुंबांनी भारतीय सिनेसृष्टीला बरेच सुपरस्टार दिले आहेत. पण तुम्हाला माहितीये का, भारतातील सर्वांत श्रीमंत फिल्म फॅमिली कोणती आहे?
2 / 8
भारतातील सर्वांत श्रीमंत फिल्म फॅमिली ही अल्लू-कोनिडेला आहे. त्यांना मेगा फॅमिली असंही म्हटलं जातं. या कुटुंबातून सर्वांत आधी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणारे तेलुगू चित्रपटातील सर्वांत लोकप्रिय अभिनेता, कॉमेडियन आणि निर्माते अल्लू रामलिंगैय्या होते.
3 / 8
अल्लू रामलिंगैय्याने 1950 मध्ये 'पुत्तिलू' या चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 1000 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. 1990 मध्ये त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
4 / 8
अल्लू-कोनिडेला कुटुंबातून कमीत कमी तीन पिढ्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. अल्लू रामलिंगैया यांच्या चार मुलांपैकी अल्लू अरविंद निर्माते बनले. तर अल्लू अरविंद यांचा मुलगा अल्लू अर्जुन साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे.
5 / 8
अल्लू रामलिंगैया यांची मुलगी सुरेखाने अभिनेता चिरंजीवी यांच्याशी लग्न केलं. चिरंजीवी हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वांत मोठे सुपरस्टार आहेत. चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण यानेसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख बनवली.
6 / 8
चिरंजीवी यांचा भाऊ पवन कल्याण आणि नागेंद्र बाबूसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार आहेत. नागेंद्र बाबू यांचा मुलगा वरुण तेजसुद्धा अभिनेता आहे. तर चिरंजीवी यांची बहीण विजय दुर्गा यांचा मुलगा साई धरम तेजसुद्धा इंडस्ट्रीत सक्रिय आहे.
7 / 8
या मेगा कुटुंबाच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास, सर्व सदस्यांची एकूण प्रॉपर्टी 6000 कोटी रुपये इतकी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या कुटुंबातील सर्वांत श्रीमंत सदस्य हे चिरंजीवी आणि रामचरण आहेत. चिरंजीवी यांची संपत्ती तब्बल 1600 कोटींपेक्षा जास्त आहे. तर रामचरणसुद्धा 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे.
8 / 8
या कुटुंबाच्या पाच फिल्म प्रॉडक्शन कंपन्या आहेत. यामध्ये गीता आर्ट्स, अंजना प्रॉडक्शन्स, पवन कल्याण क्रिएटिव्ह वर्क्स, कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी, अल्लू स्टुडिओ यांचा समावेश आहे.