सिम्हाद्री कोल फायर पॉवर स्टेशनच्या परिसरात असलेल्या जलाशयात हा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
Follow us
आंध्र प्रदेशात देशातील सर्वाधिक मोठा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय औष्णिक उर्जा निर्मिती (NTPC) संस्थेकडून मान्यता मिळालेल्या या सौरउर्जा प्रकल्पातून 25 मेगावॅट वीजेची निर्मिती होईल.
सिम्हाद्री कोल फायर पॉवर स्टेशनच्या परिसरात असलेल्या जलाशयात हा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
हा प्रकल्प भारतातील सौरउर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरू शकतो. भारताने आगामी काळात रिन्युबल एनर्जीवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.
पाण्यावर उभारण्यात आलेल्या या सौरउर्जा प्रकल्पामुळे या भागातील तापमान कमी राहण्यास मदत होईल. तसेच पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाऊन पाण्याचा अपव्यय टळेल.
सिम्हाद्री जलाशयाच्या 75 एकर क्षेत्रात हा तरंगात सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात एक लाख सोलर पीव्ही मॉड्यूल असून त्या माध्यमातून उर्जानिर्मिती होईल.
या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 7000 घरांना वीज उपलब्ध होईल. तसेच या परिसरातील कार्बन डायऑक्सईडचे उत्सर्जन 46000 टन इतक्या प्रमाणात घटेल, असा अंदाज आहे.