चुकीच्या लग्नात घालवली 10 वर्षे, दोन मुलांनंतरही सुधारला नाही पती, अभिनेत्री म्हणाली “समाजात 100 अफेअर्स..”

पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर नादियाने रिटायर्ड पीएएफ फायटर पायलट फैजल मुमताज रावशी दुसरं लग्न केलं. या दोघांनी एका मुलाला दत्तक घेतलंय. नादियाने अनेक हिट शोजमध्ये काम केलंय. डॉली डार्लिंग, ऐसी है तनहाई, बंधन, भ्रम, कोई तो हो, पहजान यांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

| Updated on: May 16, 2024 | 3:06 PM
नादिया खान ही पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री आहे. 'नादिया खान शो' हा प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय आहे. एका टॉक शोमध्ये नादियाने तिच्या लग्नातील वादाचा खुलासा केला. नादियाचं पहिलं लग्न खवर इक्बालशी झालं होतं.

1 / 5
खवर आणि नादिया यांना दोन मुलं आहेत. बरीच वर्षे एकत्र राहिल्यानंतर आणि दोन मुलांच्या जन्मानंतर अखेर तिने पतीला घटस्फोट दिला. नादियाने सांगितलं की तिचं हे लव्ह मॅरेज होतं आणि पूर्व पतीने तिला प्रपोज केलं होतं. मात्र दोघं डेटवर गेले नव्हते. दुसऱ्या भेटीनंतर त्यांनी थेट साखरपुडा केला.

2 / 5
"मी फार मोकळ्या विचारसरणीची नाही. म्हणूनच लग्नात खुश नसतानाही मी पूर्व पतीसोबत दहा वर्षे सोबत राहिली. मला दहा मिनिटांत समजलं होतं की हे लग्न चुकीचं आहे. पण त्यानंतरही मी दहा वर्षांचा संसार केला. पतीला घटस्फोट द्यावा असा विचारसुद्धा माझ्या मनात येत नव्हता", असं तिने सांगितलं.

3 / 5
याविषयी ती पुढे म्हणाली, "आमच्या आवडी-निवडी खूप वेगळ्या होत्या. मी विचार केला की ही माझ्या नशिबी आलेली शिक्षा असो किंवा आणखी काही.. पण मी माझ्या नात्याला टिकवेन. या नात्याला वाचवण्यासाठी मी प्रयत्न केले नाही, ही खंत मला ठेवायची नव्हती. पण यात दहा वर्षे मी माझं मन मारून राहिले. अल्लाहने माझी परीक्षा घेतली होती."

4 / 5
दोन मुलांच्या जन्मानंतरही पतीच्या स्वभावात काहीच बदल झाले नव्हते, असं तिने सांगितलं. नादियाने तिच्या आईवडिलांकडेही कधी याबद्दलची तक्रार केली नव्हती. "आपल्या समाजाची वाईट गोष्ट म्हणजे लोक एखाद्याच्या 100 अफेअर्सकडे दुर्लक्ष करतील पण अयशस्वी लग्नाकडे नाही", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.