PHOTOS : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट, आता अमेरिका मदत करणार
इजिप्तच्या सुएझ कालव्यात जहाज अडकल्याने (Suez Canal Case) संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत आहे. हे जहाज अडकून आता 5 दिवस पूर्ण झालेत.
आशिया आणि युरोपमधील माल वाहून नेणारं पनामा ध्वजाचं 'द एव्हर गिवन' हे जहाज सुएझ शहराजवळ मंगळवारी कालव्यात अडकलं. त्यामुळे या मार्गातील जहाज वाहतूक अगदी ठप्प झालीय (Suez Canal Blocked Map). जागतिक व्यापारासाठी हा जलमार्ग खूप महत्त्वाचा आहे.
Follow us
इजिप्तच्या सुएझ कालव्यात जहाज अडकल्याने (Suez Canal Case) संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत आहे. हे जहाज अडकून आता 5 दिवस पूर्ण झालेत.
सुएझ कालवा प्रशासनाने या कालव्यातील मार्गात अडकलेलं जहाज हटवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. मात्र, अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे यासाठी आणखी काही मार्गांचा उपयोग केला जाणार आहे.
आशिया आणि युरोपमधील माल वाहून नेणारं पनामा ध्वजाचं ‘द एव्हर गिवन’ हे जहाज सुएझ शहराजवळ मंगळवारी कालव्यात अडकलं. त्यामुळे या मार्गातील जहाज वाहतूक अगदी ठप्प झालीय (Suez Canal Blocked Map). जागतिक व्यापारासाठी हा जलमार्ग खूप महत्त्वाचा आहे.
सुएझ कालवा प्राधिकरणाने म्हटलंय की समुद्राच्या लाटा (हाई टाइड) कमी झाल्यानंतर दोनदा प्रयत्न करण्याचा विचार आहे (Suez Canal Alternative Route). सध्या तरी इजिप्त सरकारने या ठिकाणी माध्यमांना जाण्यास निर्बंध घातलेत. जहाज हटवण्यात अपयश आल्यास जहाजावरील कंटेनर कमी करण्याचाही विचार सुरु आहे. मात्र, हे काम अवघड आहे.
ही परिस्थिती पाहता व्हाईट हाऊसने (White House on Suez Canal Evergreen Stuck) कालव्यातील जहाज हटवण्यासाठी मदत देण्याचा प्रस्ताव इजिप्तला दिलाय.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की आमच्याकडे अशी उपकरणं आणि क्षमता आहेत ज्या इतर देशाकडे नाहीत. त्याचा उपयोग करुन जहाज हटवले जाऊ शकते.”
अमेरिकेच्या प्रस्तावाला सुएझ कालवा प्राधिकरणाने सकारात्मक प्रतिसाद देत मदत स्वीकारली आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग सुरु होईल अशी आशा केली जात आहे.