Marathi News Photo gallery Pinkicha vijay aso and Paaru serial fame Sharayu Sonawane reveals marriage after a year copied alia bhatt wedding look
‘पारू’ फेम शरयू सोनावणेनं वर्षभरानंतर पोस्ट केले लग्नाचे फोटो; नेटकरी म्हणाले ‘हुबेहूब आलिया भट्ट..’
'पारू' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणेनं जवळपास वर्षभरानंतर तिचं लग्न जाहीर केलं आहे. शरयूने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले असून त्यातील तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
1 / 6
'पिंकीचा विजय असो' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि आता 'पारू' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांचा सुखद धक्का दिला आहे.
2 / 6
तब्बल वर्षभरानंतर शरयूने तिचं लग्न जाहीर केलं आहे. फिल्ममेकर जयंत लाडेशी तिने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामधील शरयूचा लूक चर्चेत आला आहे.
3 / 6
शरयूने लग्नाच्या विधीदरम्यान पारंपरिक नऊवारी साडी नेसली होती. मात्र त्यानंतर तिने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नातील लूक हुबेहूब कॉपी केल्याचं पहायला मिळालं. आलियाने तिच्या लग्नात पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
4 / 6
शरयूनेही हुबेहूब आलियासारखाच लूक केला आहे. पांढरी साडी, त्यावरील दागिने आणि माथा पट्टी या सर्व गोष्टी शरयूने तिच्या लग्नातील लूकसाठी जशाच्या तशा कॉपी केल्याचं दिसून येत आहे.
5 / 6
'पिंकीचा विजय असो' ही मालिका सोडल्यानंतर शरयूने तिच्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांना दिली होती. 19 सप्टेंबर 2023 रोजी तिने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर तिने थेट आता लग्नाला वर्ष झाल्याचं सांगत सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
6 / 6
शरयूचा पती जयंत लाडे चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. 'अ पेईंग गेस्ट', 'सूर सपाटा' या चित्रपटांची निर्मिती त्याने केली आहे. या चित्रपटांमध्ये शरयूसुद्धा झळकली होती. तिच्यावर चाहत्यांकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.