राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं धडक मोर्चाचं आयोजन केलं होते. भाजपचा मोर्चा विधानभवनावर धडकणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मोर्चाला जनतेचा भयानक प्रतिसाद आहे. जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
भाजपच्या धडक मोर्चाला आझाद मैदानातून सुरुवात झाली. धडक मोर्चासाठी भाजपचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं विराट मोर्चा काढला. या मोर्चात महाविकास आघाडी सरकार आणि नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबााजी करण्यात आली.
भारतीय जनता पक्षानं आझाद मैदानातून सुरु केलेला धडक मोर्चा पोलिसांनी मेट्रो सिनेमा इथं अडवला. मोर्चा अडवल्यानंतर पोलिसांशी संघर्ष करु नका, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.
नवाब मलिक यांचा राजीनामा जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत संघर्ष सुरु राहील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.भाजपच्या धडक मोर्चात किरीट सोमय्या देखील सहभागी झाले होते. पोलिसांनी मेट्रो सिनेमा इथं मोर्चा अडवून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरु राहिल, असं भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटलं. तर, नवाब मलिक राजीनामा दो अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. भाजपच्या प्रमुख नेत्यांना मेट्रो सिनेमा येथे ताब्यात घेण्यात आलं,
भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी मेट्रो सिनेमा येथे ताब्यात घेतलं.