पंजाब विधानसभेच्या पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघाचे निकाल माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrindar singh) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कॅप्टन यांचा आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली (Ajit Pal singh Kohli) यांच्याकडून पराभव झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव धक्कादायक आहे, कारण गेल्या चार वेळा (2002, 2007, 2012 आणि 2017) ते या जागेवर सातत्याने विजय मिळवत आहेत.
मुख्यमंत्री चरणजीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी यावेळी दोन जागी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. चमकौर साहिब या मतदारसंघातून आपचे उमेदवार चरणजीत सिंह यांनी चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला. भदौर या ठिकाणी आपच्या लाभ सिंग अगोक यांनी चन्नी यांचा पराभव केला.
पंजाब विधानसभा निवडणुकीतील आजचा आणखी एक धक्कादायक निकाल म्हणजे सिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश बादल यांना पराभवाचा झटका बसला आहे. प्रकाश बादल यांचा लांबी मतदारसंघात पराभव झाला. आपच्या गुरुमीत सिंह यांनी प्रकाशसिंह बादल याचा पराभव केला.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना देखील पराभवाचा झटका बसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देकील हरिश रावत यांना पराभवाला तोंड द्यावं लागलं होतं.
उत्तराखंडमध्ये भाजपनं पुन्हा सत्ता मिळवलीय. मात्र, तिथं भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना खटिमा मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी पुष्कर धामी यांचा पराभव केला.