या प्रसंगी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड भावूक झालेले दिसले. एका बापाच्या भावूक भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होत्या.आपल्यावर प्रेम करणारी, वेळेप्रसंगी ओरडणारी मुलगी उद्या घरात नसणार म्हणजे घराचं घरपणच जाणार. लग्न साध्या पद्धतीने व्हावे ही मुलीचा इच्छा होती म्हणूनच या पद्धतीने लग्न करण्यात आले आहे. अशी माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी दिली.