डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतील 'राजगृह' या निवासस्थानी राहायला गेले तेव्हा काढलेला हा फोटो. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्नी रमाबाई आंबेडकर, वहिनी लक्ष्मीबाई, भाचा मुकुंदराव आणि त्यांचा पाळीव कुत्रा टॉबी.
औरंगाबादमध्ये महाविद्यालयाचं भूमीपूजन केल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ. आंबेडकर वेरुळची लेणी पाहताना. (1 सप्टेंबर 1951)
कायदामंत्री म्हणून डॉ. आंबेडकर हिंदू कोड बिलावर संसदेत चर्चा करताना.
कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. आंबेडकर मुंबईत परतले. (18 नोव्हेंबर, 1951) त्यानंतर पक्षाच्यावतीनं बोरीबंदर रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत करण्यात आलं. त्यावेळी रायबहादूर सी. के. बोले यांना बसायला जागा नसल्यानं डॉ. आंबेडकरांनी त्यांना मांडीवर बसवलं.
डॉ. आंबेडकर यांनी मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात आयोजित केलल्या विद्यार्थी संसदेत हिंदू कोड बिलाच्या समर्थनात भाषण केलं होतं तेव्हाचा फोटो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक निवांत क्षण.
6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी मुंबईत आणण्यात आले होते. अंत्यसंस्कारही मुंबईतच करण्यात आले. या तेजस्वी पुरुषाचे शेवटचा फोटो.