Political Leaders Diwali Celebration | फडणवीस, गडकरी ते मुंडे, राजकीय नेत्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो
राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षी प्रमाणे परळीतील बाजारपेठेत विविध व्यावसायिक आणि व्यापारी बांधवांना त्यांच्या दालनांमध्ये जाऊन लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये.
-
-
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी यंदाही दिवाळी त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली.
-
-
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर आणि परिसरातील जनतेच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये विधिवत लक्ष्मीपूजन करत दिवाळी साजरी केली.
-
-
भाजपचे विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजासोबत घरी लक्ष्मीपूजन करत दिवाळी साजरी केली.
-
-
त्यांनी सागर निवासस्थानी सहकुटुंब लक्ष्मीपूजन केले.
-
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह लक्ष्मीपूजन करत दिवाळी साजरी केली
-
-
राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षी प्रमाणे परळीतील बाजारपेठेत विविध व्यावसायिक आणि व्यापारी बांधवांना त्यांच्या दालनांमध्ये जाऊन लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये.
-
-
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन करत कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.
-
-
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे दिवाळीनिमित्त मूळगावी पाथरवाला येथे गेले होते. तिथे त्यांनी सहकुटुंब, सहपरिवारासोबत लक्ष्मीपूजन केले.
-
-
तसेच, सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो, असं साकडंही देवाकडे घातलं
-
-
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह दिवाळी साजरी केली.
-
-
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या परिवारासह दिवाळी साजरी केली