Russia Ukraine War : युक्रेन सीमेनजीक रशियाच्या 150 लढाऊ हेलिकॉप्टर्ससह लाखो सैनिक, सॅटेलाईट फोटोतून धडकी भरवणार वास्तव
रशियाच्या पहिल्या निशाण्यावर मी असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर माझं कुटुंब असल्याचं झेलेंस्की यांनी म्हटलं होतं. रशियन सैन्य कीव मध्ये घुसलं आहे.माझं कुटुंब गद्दार नसून मी देश सोडून पळून जाणार नसल्याच झेलेंस्की म्हणाले होते.
सॅटेलाईट फोटोतून यूक्रेनच्या सीमांजवळ असणार रशियन सैन्य दिसतंयImage Credit source: AFP
Follow us
रशिया आणि यूक्रेन यांच्या संघर्षाचे सॅटेलाईट फोटो समोर आलेले आहेत. या फोटोतून यूक्रेनच्या सीमेजवळ 150 हेलिकॉप्टर आणि सैनिक दिसून आले आहेत.
मैक्सार टेक्नॉलॉजीद्वारे घेतलेल्या फोटोतून हे दिसून येत आहे. दक्षिण बेलारूस भागातील हे फोटो दिसून आले आहेत. बेलारुसचं शहर चोजनिकी येथे हेलिकॉप्टर दिसून येत आहेत. 90 पेक्षा अधिक हेलिकॉप्टर रस्त्यावर दिसून येत आहेत.
अमेरिकन खासगी कंपनीच्यानुसार हे फोटो शुक्रवारी घेण्यात आलेले आहेत. सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या फोटोतून यूक्रेनच्या सीमेपासून 20 मैलावर दक्षिण बेलारुसमध्ये सैन्य तैनात असल्याचं दिसून आलं आहे. 150 ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर दिसून आले आहेत.
बेलारुसचं शहर चोजनिकीच्याजवळ रस्त्यावर 90 हून अधिक हेलिकॉप्टर दिसून आले आहेत. यूक्रेनच्या सीमेपासून हेलिकॉप्टर पाच मैल अंतरावर असल्याचं दिसून आलं आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरु आहे.
मैक्सार टेक्नॉलॉजीचा वापर करुन सॅटेलाईटद्वारे फोटो जारी करण्यात आले आहेत. यूक्रेनच्या सीमेजवळ लाखों रशियन सैनिक असल्याचं दिसून आलं आहे.